spot_img
spot_img
spot_img

सोमाटणे फाटा येथे दोन सराईतांकडून दोन देशी पिस्तुले जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत दोन तरुणांकडे बेकायदेशीररीत्या देशी बनावटीची पिस्तुले बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत दोघांना अटक केली. ही कारवाई सोमाटणे फाटा येथे रविवारी (दि. 29) सायंकाळी करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट-2 चे पोलीस शिपाई अजिनाथ राणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा येथील हॉटेल न्यू डायमंडसमोर तळेगाव-देहूरोड मार्गावर सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी पप्पू उर्फ विनोद राकेश पवार (वय 26, रा. दत्तानगर, चिंचवड) आणि रोहन सिताराम सावंत (वय 24, रा. दत्तानगर, चिंचवड) यांच्याकडून प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही आरोपींकडे ही शस्त्रे आढळून आल्याने त्यांच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम 1959, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे शस्त्रे कशी आली आणि त्यांचा वापर कोणत्या हेतूसाठी केला जाणार होता याचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस व गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!