spot_img
spot_img
spot_img

‘एसआयआर’ मोहिमेत गोंधळ? माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचे नावच यादीत नसल्याचा आरोप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार पडताळणी (SIR) मोहिमेदरम्यान मतदार यादीतील त्रुटींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पत्रकार परिषद घेऊन धनकवडे यांनी याबाबत माहिती देताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “मी 1997 पासून सातत्याने निवडणुका लढवत आलो आहे. अनेक वर्षांपासून मतदार म्हणून नोंद असतानाही आता माझे नाव मतदार यादीत दिसत नाही.”

धनकवडे यांनी सांगितले की, एसआयआर मोहिमेअंतर्गत पडताळणी सुरू असताना त्यांनी स्वतः नाव तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित यादीत त्यांचे नाव आढळून आले नाही. “एसआयआरसाठी अधिकारी येत असताना देखील माझे नाव सापडत नाही. मग सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मतदार यादीतील अशा प्रकारच्या त्रुटींमुळे नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ शकते, अशी चिंता व्यक्त करत त्यांनी प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेत मतदारांची नावे, पत्ते आणि इतर तपशीलांची पडताळणी केली जात असून, अनेक ठिकाणी नावे वगळली जाणे किंवा चुकीची नोंद आढळल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. धनकवडे यांच्या आरोपांमुळे या प्रक्रियेच्या अचूकतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!