spot_img
spot_img
spot_img

पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी मोरया गोसावी मंदिरात आरती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी चिंचवड भाजप मंडळ तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांच्या वतीने चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिरात विशेष आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नगरसेवक सुरेश भाऊ भोईर यांच्या हस्ते त्यांना शाल आणि श्री मोरया गोसावी यांच्या आत्मचरित्राचे पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात आरती संपन्न झाली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!