spot_img
spot_img
spot_img

CJP च्या आंदोलनाला युवकांचा वाढता पाठिंबा; रोहित पवार यांचे समर्थन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतरमंतरवरील आंदोलनाला देशभरातील युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. युवकांमधील वाढत्या असंतोषाचे हे आंदोलन प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळणारा युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे युवकांमधील असंतोषाची खदखद आहे. NEET आणि CBSE परीक्षांमधील गोंधळ तसेच केंद्र शासनाच्या अनेक चुकीच्या धोरणांचा थेट परिणाम देशातील युवकांवर झाला आहे. त्यामुळे देशातील युवा वर्ग पेटून उठला आहे. युवकांच्या हितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला एक युवक म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा आहे.”

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांना शनिवारी जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी दिली. अमेरिकेहून परतल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाच्या टर्मिनल-३ येथे काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CJP ने सुरुवातीला आंदोलकांना पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशन येथे जमण्याचे आवाहन केले होते. मात्र, पोलिसांकडून जंतरमंतर येथे परवानगी मिळाल्यानंतर पक्षाने सर्व समर्थकांना थेट जंतरमंतर येथे पोहोचण्याचे आवाहन केले.

जंतरमंतर येथे आंदोलनाला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने युवक आणि समर्थक सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला असून युवकांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!