spot_img
spot_img
spot_img

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निगडीत वृक्षारोपणाचा उत्साहपूर्ण उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन, लायन्स क्लब पुना निगडी आणि लायन्स क्लब इनोव्हेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. मल्लिकार्जुन मंदिर उद्यान तसेच सेक्टर २७ येथील संत तुकाराम उद्यान येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

“एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपक्रमात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वाढते प्रदूषण, घटते हरित क्षेत्र आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपट्याचे संगोपन करण्याचा संकल्पही करण्यात आला.

या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, सहकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून वृक्षसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सातत्यपूर्ण जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!