spot_img
spot_img
spot_img

जागतिक पर्यावरण दिन : चिंचडगाव प्रभाग १८ मध्ये नागरिकांच्या सहभागातून देशी वृक्षांची लागवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आज ०५ जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने चिंचडगावातील प्रभाग १८ मधील बटरफ्लाय ब्रिज या परिसरात वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

“हरित प्रभाग, स्वच्छ प्रभाग” या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिन याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, नगरसेविका अपर्णाताई डोके, व मनिषाताई चिंचवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

पालिका उद्यान विभागाचे कांबळे साहेब, नाळे साहेब व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनचाफा, व कडुलिंब यांसारख्या देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. या उपक्रमात प्रभागातील भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, वारकरी संप्रदायातील रामभाऊ घुले, विलास उर्फ बाळासाहेब चिंचवडे, स्थानिक नागरिकांमध्ये गतीराम दादा भोईर, तानाजी बापू निंबाळकर, किशोर निंबाळकर, अशोक बारणे, गोरख पवार, सुरेश कुरहाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली भोईर, बांधकाम व्यावसायिक जयंत सोले, मोहन देशपांडे, मधुकर कुलकर्णी, संतोष भालेराव,सर्जेराव कोळी, गणपत वाबळे, लक्ष्मण माहुरे, शिवाजी देशमुख व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग १८ च्या सर्व कार्यकर्त्यांनी व पालिका उद्यान विभागाने विशेष परिश्रम घेतले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!