spot_img
spot_img
spot_img

शुभांगी वसंतराव शेवडे यांचे निधन

शबनम न्यूज| प्रतिनिधी 

 पिंपरी-चिंचवडच्या संत तुकारामनगर परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी वसंतराव शेवडे (वय ७८) यांचे आज (गुरुवारी) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संत तुकारामनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी शेवडे या कोकणातील त्यांच्या मूळ गावी वनगुळे येथे गेल्या होत्या. तेथून पिंपरीकडे परत येत असताना प्रवासादरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.

शुभांगी शेवडे यांनी अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. परिसरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. साधी राहणी, समाजाभिमुख वृत्ती आणि सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्या नागरिकांमध्ये लोकप्रिय होत्या.

त्या माजी नगरसेवक वसंतराव शेवडे यांच्या पत्नी तसेच दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि इंद्रायणी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संदीप शेवडे यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या पश्चात पती वसंतराव शेवडे, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवार) दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता नेहरूनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!