पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
चिखलीतील संविधान चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रवि कांबळे (वय २८, रा. अजिंठनगर, चिंचवड) यांना आरोपी अमित तानाजी जानराव याने संविधान चौक येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आरोपीने विनाकारण लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर तसेच हातांवर वार करत गंभीर दुखापत केली.
ही घटना २६ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. ३४०/२०२६, भा.न्या.सं. कलम ११८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लांडगे करीत आहेत.


