spot_img
spot_img
spot_img

लायन्स पॉईंट येथे २५० फूट खोल दरीत पडून नेव्ही कर्मचाऱ्याचा मृत्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लोणावळा येथील प्रसिद्ध लायन्स पॉईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली असून INS शिवाजी (नेव्ही) येथील एका कर्मचाऱ्याचा सुमारे २५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.

राकेश कुमार मिश्रा (वय ५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेव्हीचे पथक, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, मावळ आपत्ती व्यवस्थापन तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. संयुक्त बचाव मोहिम राबवत संबंधित पथकांनी दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.

दरम्यान, लोणावळा ग्रामीण पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!