spot_img
spot_img
spot_img

भोसरीत मध्यरात्री कोयता घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

भोसरी परिसरात मध्यरात्री अवैधरित्या कोयता बाळगून फिरणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई दिघी रोडवरील सँडवीक कॉलनी परिसरात करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश सुरेंद्र सिंग (वय १९, रा. गणेशनगर, बोपखेल) हा तरुण हरी ओम सोसायटीसमोरील रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांना आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना लोखंडी कोयता आढळून आला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू केलेले असतानाही आरोपीने त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!