पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
वाकड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत कस्पटे चौक परिसरातून एका आरोपीला एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जसह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.२५) सायंकाळी मुळा नदीवरील अर्धवट तयार पुलाजवळ करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश भगवान ससाणे (वय ३५, रा. बालेवाडी फाटा, बाणेर) याच्या ताब्यातून ५.४८ ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) पावडर जप्त करण्यात आली. आरोपीकडे अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, चमचा तसेच मोबाईल फोन असा एकूण ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार वंदु गिरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सपोनि दराडे करीत आहेत.


