spot_img
spot_img
spot_img

तडीपार गुंडा कोयत्यासह पिंपरीत फिरताना जेरबंद; संत तुकारामनगर पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

तडीपार आदेशाचे उल्लंघन करत धारदार कोयता घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सराईत गुंड्याला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मोकळ्या मैदानात रविवारी (दि.२५) सायंकाळी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश गोरख माने (वय ३१, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. मात्र कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता तो पुन्हा पिंपरी-चिंचवड हद्दीत प्रवेश करून फिरत होता. त्याच्याकडे ४०० रुपये किंमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला.

विशेष म्हणजे शहरात लागू असलेल्या मनाई आदेशानुसार घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही आरोपी कोयत्यासह फिरत होता. पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार आसवले करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!