spot_img
spot_img
spot_img

रूम खाली करण्याचा राग; देहूरोडमध्ये सुरक्षा रक्षकावर फरशीने हल्ला

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

रूम खाली करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून मद्यधुंद तरुणांनी सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना देहूरोड परिसरात घडली. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका आरोपीसह तीन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ जगन्नाथ मोरे (वय ४५, रा. देहूगाव) हे नखाते कॉम्प्लेक्स येथे ड्युटीवर असताना रविवारी (दि.२५) पहाटे एकच्या सुमारास आरोपी आदित्य डोलारे (वय २०, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) हा तीन साथीदारांसह तेथे आला. महिनाभरापूर्वी रूम खाली करण्यास सांगितल्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातून त्यांनी दारूच्या नशेत फिर्यादीवर फरशी फेकून हल्ला केला. या हल्ल्यात मोरे यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस व छातीवर गंभीर दुखापत झाली.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!