पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
भुकूम परिसरात किरकोळ अपघाताचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीला धक्का लागल्याच्या रागातून दोन तरुणांनी टेम्पो चालकाला मारहाण करत वाहनाची काच फोडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित रघुनाथ घारे (वय १९, रा. पिरंगुट) हे सुपर कॅरी टेम्पो घेऊन भुगाव ते पौड रोडवरून जात होते. मानस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसमोर त्यांच्या टेम्पोचा धक्का आरोपींच्या अपाची दुचाकीला लागल्याने दोघे खाली पडले. या घटनेचा राग मनात धरून आरोपी श्लोक रावल याने टेम्पोची समोरील काच फोडून रोहित यांना स्टीलच्या कड्याने मारहाण केली. तर मोहित शर्मा याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून बावधन पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पुढील तपास पोउपनि पवार करीत आहेत.


