पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
ताथवडे परिसरात घरफोडीची मोठी घटना उघडकीस आली असून चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करत तब्बल १८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुखदेव दिनकर पवार यांच्या नवलेवस्ती येथील घरात दि. ११ मे ते २० मे दरम्यान चोरीची घटना घडली. घराचे दार उघडे असल्याचा फायदा घेत आरोपीने थेट घरात प्रवेश केला.
यानंतर कपाटात ठेवलेले सुमारे २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सचिन भगवान सहजराव याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि देशमुख करीत आहेत.


