spot_img
spot_img
spot_img

निघोजेत अंमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने निघोजे परिसरात धडक कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १ किलो १९६ ग्रॅम गांजा आणि मोबाईल असा एकूण ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पायसर चौक ते वोक्सवॅगन रोडलगत जगदंब हॉटेलसमोर आरोपी संभाजी विठ्ठल मात्रे (वय ३८) हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान आरोपीकडे विक्रीसाठी ठेवलेला ११९६ ग्रॅम गांजा आणि मोबाईल हँडसेट आढळून आला. आरोपी हा डोंगरवस्ती, निघोजे येथे वास्तव्यास असून मूळचा बीड जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि पिंजारी करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!