spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध शस्त्रसाठ्यावर गुन्हे शाखेचा मोठा प्रहार

  • चार आरोपी जेरबंद; ९ देशी कट्टे, ४६ जिवंत काडतुसे आणि वाहने जप्त
  • देहूरोड गोळीबार हत्याकांडानंतर पोलिसांची धडक मोहीम तीव्र

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या अवैध अग्निशस्त्रविरोधी मोहिमेत गुन्हे शाखा युनिट-१ ने मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ९ देशी कट्टे, ५ अतिरिक्त मॅगझिन, ४६ जिवंत काडतुसे आणि दोन वाहने असा सुमारे ८ लाख रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

देहूरोड परिसरात नुकत्याच घडलेल्या व्यापाऱ्याच्या गोळीबार करून हत्येच्या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधातील कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार संपूर्ण आयुक्तालय हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी अवैध शस्त्रसाठ्याबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३४/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा गुन्हे शाखा युनिट-१ कडे वर्ग करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी खालील चार आरोपींना अटक केली :

अझरुद्दीन रफिक सुतार (वय ३०, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव)

वैभव अशोक शेटे (वय ३१, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव)

सौरभ धनंजय जाधव (वय २७, रा. पाषाण)

अक्षय अशोक कांबळे (वय ३१, रा. पाषाण)

आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींकडून ९ देशी कट्टे, ५ अतिरिक्त मॅगझिन, ४६ जिवंत काडतुसे आणि २ वाहने असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, महादेव जावळे, अजय डगळे, देवा राऊत, शिवराम भोपे, विजय शेळकंदे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, महिला पोलीस हवालदार उषा दळे तसेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!