spot_img
spot_img
spot_img

बावधनमध्ये अनैतिक कृत्यांवर पोलिसांची कारवाई; सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन, महिलेविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

बावधन परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून नागरिकांना त्रास देत अनैतिक कृत्य करत असल्याची घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी महिला सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.०४ वाजण्याच्या सुमारास बावधन येथील बेंगलोर–मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर, रॉयल लॉजच्या बाजूला गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तपास केला असता संबंधित महिला सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडे अश्लील हावभाव करत व शब्द उच्चारत अनैतिक कृत्य करत असल्याचे आढळून आले.

या प्रकारामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७०/२०२६ नुसार अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कदम करीत असून, शहरात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या अनैतिक कृत्यांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!