spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये संविधान दिन उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच पीसीयू चे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या समवेत संविधानातील सार्वभौमत्व, अखंडता व लोकशाही मूल्यांचे जतन करीत न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे प्रामाणिक आचरण करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. 
  पीसीयू ग्रंथालय विभाग आणि स्कूल ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधान विषयी अधिक जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पीसीयू मध्यवर्ती ग्रंथालयात संविधान व कायदे विषयक विशेष ग्रंथांचे, दस्तऐवजांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
    यावेळी आशिष देशपांडे यांनी ‘संविधान मार्गदर्शक’ या विषयावर संबोधित करताना सांगितले की, शासन व्यवस्था, नागरिकत्व आणि सामाजिक प्रगतीसाठी भारतीय संविधान हा अमूल्य दस्तऐवज आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ आहेत. संवैधानिक हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि सशक्त राष्ट्रनिर्मिती साठी युवा वर्गाची भूमिका महत्वाची आहे. पीसीयूचे कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पी सी यु व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!