spot_img
spot_img
spot_img

कृष्णानगरीतील खचलेल्या गट्टूंची नगरसेवक सागर कोकणेंकडून तातडीने दखल; नवीन गट्टू बसविण्याचे काम सुरू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रहाटणी : रहाटणी परिसरातील कृष्णानगरी येथे गट्टू खचल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची नगरसेवक सागर कोकणे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना नवीन गट्टू बसविण्याच्या सूचना दिल्या.

नगरसेवक कोकणे यांच्या सूचनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत नवीन गट्टू बसविण्याचे काम सुरू केले. या कामाची नगरसेवक सागर कोकणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच काम दर्जेदार पद्धतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

खचलेल्या गट्टूंमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी धर्मवीर गार्डनचे अध्यक्ष बाळासाहेब काळे उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!