spot_img
spot_img
spot_img

संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्ये जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – योगेश बहल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष  योगेश मंगलसेन बहल यांनी उपस्थितांना संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात बहल म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी अत्यंत परिश्रम, अभ्यास आणि दूरदृष्टीने कार्य केले. अनेक आव्हानांचा सामना करून त्यांनी देशाला एक सशक्त, लोकशाहीवादी आणि न्यायाधिष्ठित संविधान दिले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा संदेश दिला आहे. संविधानातील मूल्यांचे पालन करणे आणि लोकशाही अधिक बळकट करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.”

यावेळी ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी आपल्या मनोगतात संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाला न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा देशाचा सर्वोच्च आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन केले.
सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास सर्व उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमास योगेश मंगलसेन बहल, मा.स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा.नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, राजेंद्र जगताप, नगरसेविका माया बारणे, संगीता नानी ताम्हाणे, दीप्ती कांबळे, सारिका मासुळकर, अरुणा लंगोटे, आशा शेडगे, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, तुषार सहाणे, सारंग कामतेकर, सतीश दरेकर, सचिन औटे, शेरबहादुर उर्फ मायला खत्री, ज्ञानेश्वर कांबळे, बबन गाढवे, सचिन गायकवाड, अकबर मुल्ला, संगीता कोकणे, कुमार कांबळे, बाळासाहेब पिल्लेवार, चंद्राम हलगी, विनोद वरखडे, मंगेश बारणे, तुषार ताम्हाणे, गोरोबा गुजर, बापू सोनवणे, संभाजी बारणे, अंकुश बिराजदार, गणेश लंगोटे, डॅनियल दळवी, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदी नगरसेवक-नगरसेविका, सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!