spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागरमध्ये विकासाचा नवा ‘प्रकाश’; कुणाल आयकॉन रोडवर अँटिक पथदिव्यांचा प्रयोग, शत्रुघ्न काटे यांनी घेतला आढावा

‘पोस्ट टॉप डेकोरेटिव्ह फिटिंग’ आणि ‘बरीड लाईट्स’च्या माध्यमातून रस्त्याच्या सौंदर्यात भर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील नव्याने विकसित होत असलेल्या कुणाल आयकॉन रोडवरील फुटपाथवर ‘Post top decorative fitting and buried Lights’ या आकर्षक अँटिक पथदिव्यांची प्रायोगिक तत्वावर उभारणी करण्यात आली आहे. या कामाची भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बारकाईने पाहणी केली.यावेळी बसविण्यात आलेल्या दिव्यांची रचना, प्रकाशाचा परिणाम आणि फुटपाथच्या सौंदर्यात होणारी वाढ याबाबत त्यांनी आढावा घेतला.

​परिसराचा कायापालट आणि आधुनिक नागरी सुविधांसाठी कुणाल आयकॉन रोडचा विकास वेगाने केला जात आहे. या मार्गावरून रात्रीच्या वेळी चालणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षा तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने फुटपाथवर हे आकर्षक अँटिक दिवे बसविण्यात आले आहेत. याचा सकारात्मक परिणाम आणि तांत्रिक बाबी तपासण्यासाठी सध्या हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जात आहे.

​पाहणी दरम्यान शत्रुघ्न काटे यांनी पथदिव्यांची रचना, प्रकाशयोजना आणि स्थापत्य कामाचा आढावा घेतला.

“पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. कुणाल आयकॉन रोडवरील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित, प्रसन्न आणि सुसज्ज वातावरण मिळावे, या उद्देशाने हे अँटिक पथदिवे प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आले आहेत. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहून संपूर्ण परिसरात अशाच दर्जेदार व नाविन्यपूर्ण सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– शत्रुघ्न (बापू) काटे
नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष

​

प्रायोगिक तत्वावरील हे काम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मार्गावर अशाच दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासनासोबत पुढील नियोजन केले जाणार आहे.

या उपक्रमामुळे कुणाल आयकॉन रोडला एक वेगळी आणि आकर्षक ओळख मिळणार असून, स्थानिक नागरिकांकडून या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता, सौंदर्य आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने कुणाल आयकॉन रोडवरील हा प्रयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नगरसेविका सौ अनिताताई काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेवक जयनाथशेठ काटे यांनी ही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले आहे.

याप्रसंगी विद्युत कार्यकारी अभियंता सचिन नांगरे,उपअभियंता दिपाली धेडे मॅडम,कनिष्ठ अभियंता श्री गिरीधर कोरे तसेच कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!