spot_img
spot_img
spot_img

जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे १५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याची किट देण्यात आली. नगरसेवक अनिल उर्फ बापू घोलप यांच्या पुढाकाराने गावात हा वाटप कार्यक्रम पार पडला.

आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमातून कोल्हेवाडीतील कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात आली. घरातील रोजच्या जेवणासाठी लागणारे अन्नधान्य उपलब्ध करून देत गरजू कुटुंबांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लावणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

वाटप कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांनी आमदार महेश लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गावातील गरजू कुटुंबांची अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी नगरसेवक अनिल उर्फ बापू घोलप यांचे आभार मानले.

“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हेवाडीतील गरजू कुटुंबांच्या दैनंदिन गरजेला हातभार लावावा, या उद्देशाने आम्ही १५० कुटुंबांना अन्नधान्याची किट दिली. घरात रोजच्या जेवणासाठी लागणारे धान्य वेळेवर मिळणे, ही त्या कुटुंबांसाठी मोलाची मदत आहे. ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमातून ही मदत थेट कुटुंबांपर्यंत पोहोचवता आली, याचे समाधान आहे.”
– अनिल उर्फ बापू घोलप, नगरसेवक, भाजपा.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!