महोत्सवात स्थानिक खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. सामन्यांमधील चुरस आणि खेळाडूंच्या उत्साहाला क्रिकेटप्रेमींनीही उत्स्फूर्त दाद दिली.
स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे नव्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळते आणि शहराच्या क्रीडा संस्कृतीला बळ मिळते, असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले. खेळाडूंच्या मेहनतीला मिळालेली दाद त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि महोत्सवाच्या आयोजनाबद्दल कमलेश वाळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
“स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि चुरशीच्या सामन्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा क्रिकेट महोत्सव आयोजित केला. खेळाडूंनी जिद्दीने खेळ केला आणि क्रिकेटप्रेमींनीही त्यांना भरभरून दाद दिली. या स्पर्धेतून मिळालेला अनुभव तरुण खेळाडूंना पुढील वाटचालीत उपयोगी पडेल, असा विश्वास आहे.”




Total Users : 243460