spot_img
spot_img
spot_img

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त १२० गरजू कुटुंबांना मदत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा उत्सव नव्हे, तर समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान फुलविण्याची संधी! याच माणुसकीच्या भावनेतून भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील दुर्गम भागात मदतीचा हात पोहोचविण्यात आला.

आमदार महेशदादांचे सहकारी तथा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी राजगुरूनगर–खेड तालुक्यातील आघाणे व डोन गावांच्या दुर्गम भागातील सडकेची वाडी, मसन माळ आणि कापरवाडी येथे प्रत्यक्ष भेट देत १२० गोरगरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य साहित्याच्या किटचे वाटप केले.

डोंगरदऱ्यांतील दुर्गम वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मदतीचा आधार त्यांच्या दारापर्यंत पोहोचला. केवळ मदतवाटप न करता, कुटुंबांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा आणि संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संवेदनशील प्रयत्न यावेळी करण्यात आला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा फलक, हार-तुरे आणि सत्कारांवरील अनावश्यक खर्च टाळून तो गरजूंच्या मदतीसाठी वळविण्याच्या संकल्पनेतून हा सेवायज्ञ सुरू आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत लोकसेवेचा वसा जपणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देत आहे.

यावेळी अशोक घबाले, मा. सरपंच दत्ता गवारी, शिवाजी पारधी, अमृत पटेल, अक्षय खोत, सचिन ठाकूर, कौस्तुभ देशपांडे, किरण घोटाळे, विशाल केंदळे, प्रभू बालचंद्रन, भरत सनईकर, भागवत सनईकर, विजय होसमनी आदी सहकारी उपस्थित होते.

“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम भागातील गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. सडकेची वाडी, मसन माळ आणि कापरवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन १२० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. अडचणीच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी लोकसेवा आणि वाढदिवसाची सार्थकता आहे.”

– प्रा. उत्तम केंदळे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!