spot_img
spot_img
spot_img

खडकुंब्यात १५० कुटुंबांना महिन्याच्या किराण्यासाठी ‘एक हात मदतीचा’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यातील तांबे गणातील खडकुंबे गावात १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या संचांचे वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या शितल धनंजय वर्णेकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळाचा सामना करणाऱ्या कुटुंबांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लावणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

प्रत्येक कुटुंबाला देण्यात आलेल्या किराणा संचात गहू आणि तांदूळ प्रत्येकी ५ किलो, बाजरी ३ किलो, साखर २ किलो, तूरडाळ आणि बेसन प्रत्येकी १ किलो, खाद्यतेल २ लिटर, चहा पावडर आणि मीठ प्रत्येकी ५०० ग्रॅम, तसेच मसाला २५० ग्रॅम यांचा समावेश होता. वाटपासाठी खडकुंबेचे सरपंच किरण शेळकंदे आणि पोलीस पाटील बाळू विठ्ठल करवाडे यांचे सहकार्य लाभले.

किरण शेळकंदे, सरपंच, खडकुंबे म्हणाले की,  “ आमदार महेश लांडगे यांच्या प्रेरणेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सौ. शितलताई धनंजय वर्णेकर यांनी आमच्या गावातील कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली, याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. या मदतीचा कुटुंबांना दैनंदिन जीवनात उपयोग होईल, असेही शेळकंदे यांनी सांगितले. त्यांनी खडकुंबे ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

“खडकुंबे गावातील १५० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून मदतीचा हात पोहोचवताना मनाला खऱ्या अर्थाने समाधान मिळाले. एखाद्याच्या घरातील चूल पेटण्यासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला थोडासा हातभार लावण्यासाठी आपण उपयोगी पडतो, यापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणतेही नाही.”

– शितल धनंजय वर्णेकर, नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!