शबनम न्यूज | प्रतिनिधी
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निलेश बोराटे यांनी दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला. निलेशशेठ बोराटे युवा मंच आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समिती सभापती सुजाता निलेश बोराटे यांच्या वतीने भोरगिरी, पाभे, भोबळे आणि बिव्हे या चार गावांतील ४५० गरजू आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
दुर्गम भागातील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने बोराटे यांनी युवा मंचाच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन केले. चारही गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत हे वाटप करण्यात आले.
आमदार महेश लांडगे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबांसाठी प्रत्यक्ष मदतीचा उपक्रम राबविण्यावर निलेश बोराटे यांनी भर दिला. विधी समिती सभापती सुजाता बोराटे आणि युवा मंचाच्या सहभागातून चार गावांतील कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात आली.

“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम भागातील कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी पडेल अशी मदत द्यावी, या हेतूने आम्ही हा उपक्रम हाती घेतला. युवा मंचाच्या सहकाऱ्यांच्या सहभागातून चार गावांतील ४५० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचवता आले, याचे समाधान आहे. या कामात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”
– निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्ते.
“आमदार महेशदादा लांडगे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम भागातील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याचे ठरवले. निलेशशेठ बोराटे युवा मंचाच्या सहकार्याने भोरगिरी, पाभे, भोबळे आणि बिव्हे येथील ४५० आदिवासी कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मदत प्रत्यक्ष पोहोचवता आली, याचे समाधान आहे. या सेवाकार्यात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”
– सुजाता बोराटे, विधी समिती सभापती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.




Total Users : 243085