spot_img
spot_img
spot_img

विधायक : कुकडेश्वरच्या १५० आदिवासी कुटुंबांच्या घरखर्चाला हातभार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ (तोरणा) प्रभाग समितीच्या सभापती तथा नगरसेविका शिवानी दादासाहेब नरळे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर गावातील १५० दुष्काळग्रस्त आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत ही मदत देण्यात आली.

दुष्काळाचा सामना करणाऱ्या कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्यासाठी नरळे यांनी या वाटपाचे आयोजन केले. मदत किटमध्ये गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, तूरडाळ, साखर, खाद्यतेल, बेसन, चहा पावडर, मसाला आणि मीठ यांचा समावेश होता.

वाटपावेळी कुकडेश्वरचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जीवनावश्यक साहित्य थेट गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार महेश लांडगे आणि नगरसेविका शिवानी नरळे यांचे आभार मानले.

“आमदार महेशदादा लांडगे हे नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीसाठी तत्पर असतात. त्यांच्या समाजसेवेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

– शिवानी नरळे, नगरसेविका तथा ‘फ’ (तोरणा) प्रभाग समिती सभापती

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!