आदिवासी कुटुंबांना २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप!
पिंपरी-चिंचवड : वाढदिवस म्हटला की हार-तुरे, पुष्पगुच्छ आणि जाहिरातबाजी, असे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र या परंपरेला फाटा देत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा सामाजिक उपक्रम नगरसेविका सौ. अर्चनाताई राजेशभाऊ सस्ते यांनी राबविला.
लोकनेते आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवाभावी उपक्रमांतर्गत दुर्गम आदिवासी भागातील कहु आणि कोयाळी या गावांमधील गरजू कुटुंबांना तब्बल २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
केवळ वाढदिवस साजरा न करता समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा ठरला. सत्ता ही पदासाठी नव्हे, तर जनसेवेसाठी असते आणि लोकप्रतिनिधित्व ही समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, याची प्रचिती अर्चनाताई सस्ते यांच्या या कार्यातून आली.
या उपक्रमावेळी नगरसेविका सौ. अर्चनाताई राजेशभाऊ सस्ते, राजेशभाऊ सस्ते, ज्ञानेश्वर सस्ते, राजू टेकाळे, प्रताप सासवडे, सचिन बनसोडे, नवनाथ बनकर, उदय तापकीर यांच्यासह कहु व कोयाळी गावांचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते महेशदादांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांना कृतीची जोड देत गरजू आदिवासी कुटुंबांच्या जीवनात मदतीचा आणि आनंदाचा प्रकाश निर्माण करणारा अर्चनाताई सस्ते व त्यांच्या सहकाऱ्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.




Total Users : 243094