शबनम न्यूज | प्रतिनिधी
सायरखाळा गावातील शेतकरी आणि आदिवासी कुटुंबांना माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. भाजपचे लोकनेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत म्हेत्रे यांनी हा पुढाकार घेतला.
‘लोकनेत्यांच्या वाढदिनानिमित्त लोकसेवेचा यज्ञ’ या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा उद्देश गरजू कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावणे हा आहे. त्याअंतर्गत सायरखाळ्यातील कुटुंबांना घरात रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू देण्यात आल्या.
या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ५१ आदिवासी गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सायरखाळ्यातील किटवाटप हा त्याच प्रयत्नाचा भाग आहे.
“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सायरखाळ्यातील शेतकरी आणि आदिवासी कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याची संधी मिळाली. या मदतीमुळे एखाद्या कुटुंबाचा काही दिवसांचा घरखर्च हलका झाला, तरी उपक्रमाचं सार्थक आहे. अडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, हीच ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमामागची भावना आहे.”
– सुरेश तात्या म्हेत्रे, माजी नगरसेवक.




Total Users : 242692