शबनम न्यूज | प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावात ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना मदत देण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे लोकनेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी भाजपच्या नगरसेविका प्रा. सौ. सोनालीताई गव्हाणे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ताभाऊ गव्हाणे यांनी पुढाकार घेतला.
खिरेश्वर गावात एकूण २२३ घरे आहेत. गावातील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी गव्हाणे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबविला. वाढदिवसाला लोकसेवेची जोड देत, अडचणीच्या काळात ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील ५१ आदिवासी गावांतील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअंतर्गत खिरेश्वर येथे सोनालीताई आणि दत्ताभाऊ गव्हाणे यांनी गावातील कुटुंबांना मदतीचा हात दिला.
या उपक्रमासाठी दत्ता भोसले, मनोज गायकवाड, मकरंद गव्हाणे, आकाश गव्हाणे, वैभव पोळ, उमेश गव्हाणे आणि सौरभ डावकर यांनी सहकार्य केले.
“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त खिरेश्वरमधील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याची संधी मिळाली. अडचणीच्या काळात आपण एकमेकांच्या पाठीशी उभं राहावं, हीच ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमामागची भावना आहे. खिरेश्वरमध्ये ही मदत पोहोचवण्यासाठी साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”
– दत्ताभाऊ गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते.




Total Users : 242692