spot_img
spot_img
spot_img

सुरकुंडीत गरजू कुटुंबांना नगरसेवक सचिन तापकीर यांचा मदतीचा हात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चऱ्होली येथील भाजपचे नगरसेवक सचिन तापकीर यांनी सहकाऱ्यांसह खेड तालुक्यातील सुरकुंडी गावाला भेट देऊन गरजू कुटुंबांना धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत तापकीर यांनी पुढाकार घेऊन ही मदत गावातील कुटुंबांपर्यंत पोहोचवली.

या वेळी सुरकुंडीचे सरपंच शशिकांत वाजे, उपसरपंच सुनील सुपे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ सरोदे, सामाजिक कार्यकर्ते बाळू घिगे, संकेत वाजे आणि भीमा जाधव, तसेच मारुती भोकटे, सोमनाथ सावंत, योगेश केदारी, विठ्ठल वाजे आणि वाजेवस्तीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. ‘एक नगरसेवक, एक गाव’ या संकल्पनेतून खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासी गावांमधील गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल असे किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचे नियोजन आहे.

नगरसेवक सचिन तापकीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खेड तालुक्यातील मौजे माजगाव येथेही भेट दिली. तेथील गरजू कुटुंबांना धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू कुटुंबांना आधार देण्याचा संकल्प या मदतकार्यातून माजगावातही कृतीत उतरला.

“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून गरजू कुटुंबांना आधार देण्याचा आम्ही संकल्प केला. त्यातूनच सहकाऱ्यांसह सुरकुंडी आणि माजगाव येथे जाऊन धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले. या मदतीमुळे कुटुंबांना दैनंदिन खर्चात काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.”
– सचिन तापकीर, नगरसेवक, भाजपा, चऱ्होली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!