spot_img
spot_img
spot_img

भोसरीत टेम्पो पार्किंगच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

टेम्पो पार्किंग करण्यासाठी जागा देण्यावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांना लोखंडी पाइप आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना भोसरीतील भगतवस्ती येथे घडली. या मारहाणीत फिर्यादीसह त्यांचे वडील आणि भावालाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांसह काही अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर जन्नत अली अन्सारी (वय २०, व्यवसाय स्क्रॅप, रा. घरकुल प्राधिकरण, चिखली, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

अनिस राजपूत (वय २२), रणजित राजपूत (वय ५१), राजबहादूर राजपूत (वय ७८) आणि २० ते २२ वर्षे वयोगटातील काही अनोळखी व्यक्ती (सर्व रा. भगतवस्ती, भोसरी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे वडील जन्नत अली अन्सारी हे फिर्यादीच्या भावाच्या अशोक लेलँड कंपनीच्या एमएच १४ एमएच ९९२८ क्रमांकाच्या टेम्पोमधून भोसरीतील भगतवस्ती येथील हनुमान मंदिराजवळील राठोड लेथ मशीन शॉपमध्ये स्क्रॅप व लोखंडी भंगार खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी टेम्पो पार्किंग करण्यासाठी तेथील मोटारसायकल बाजूला घेण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी वाद घातला. त्यानंतर अनिस राजपूत, त्याचे वडील रणजित राजपूत, आजोबा राजबहादूर राजपूत आणि इतर अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून फिर्यादी, त्यांचे भाऊ अमीर अन्सारी आणि वडील जन्नत अली अन्सारी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी अनिस याने तेथे पडलेल्या लोखंडी पाइपने फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या पाठीत मारहाण करून त्यांना जखमी केले. या हल्ल्यात फिर्यादी यांच्या नाकाच्या खालच्या बाजूस दुखापत झाली असून, त्यांचे वडील आणि भावालाही जखमा झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दगडगावकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!