spot_img
spot_img
spot_img

पत्नीवर वाईट नजरेने पाहिल्याच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पत्नीवर वाईट नजरेने पाहत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने चेहरा, डोके आणि खांद्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे घडली. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात एकाविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इनामुल हक अब्दुल बारक (वय २३, सध्या रा. गवतेवस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शाहिजुद्दीन इस्लाम (वय २२, रा. गवतेवस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मेदनकरवाडी येथील विलास शंकर भुजबळ यांच्या भाड्याच्या खोलीजवळील परिसरात ही घटना घडली. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी शाहिजुद्दीन इस्लाम हा त्यांच्या पत्नीवर वाईट नजरेने पाहत असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने फिर्यादी यांच्या तोंडावर, डोक्यावर आणि खांद्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून आरोपी पळून गेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!