शबनम न्यूज | प्रतिनिधी
फ्लॅटमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून लॅपटॉप आणि मोबाईल असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून नेल्याची घटना चऱ्होली बुद्रुक येथील काळे पेट्रोल पंपाजवळील ऊर्जा हाइट्स सोसायटीमध्ये घडली.
याप्रकरणी देविन नामदेव गेडाम (वय १९, रा. चऱ्होली बुद्रुक, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या ते साडेसातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचा लॅपटॉप तसेच मोबाईल असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.




Total Users : 235293