शबनम न्यूज | प्रतिनिधी
भरधाव आणि निष्काळजीपणे ट्रक चालवून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या वडिलांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंकुश बोऱ्हाडे चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रिया स्टोअर्स दुकानासमोर घडला.
याप्रकरणी धनंजय बाळासाहेब साळवे (वय २३, रा. साई मंदिराशेजारी, लोहा, सध्या लोकमान्य हॉस्पिटल, आकुर्डी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे वडील बाळासाहेब पंढरीनाथ साळवे (वय ४५) हे २८ ऑक्टोबर रोजी सकाळी दुचाकी क्रमांक एमएच १४ ईएल ९५७६ वरून प्रिया स्टोअर्स दुकानासमोरून जात होते. त्यावेळी अशोक लेलँड कंपनीच्या एमएच १२ एसएफ ९४९१ क्रमांकाच्या ट्रकवरील चालक पीयूष प्रकाशचंद्र मेहता (वय ४१, व्यवसाय चालक, रा. अर्णव अपार्टमेंट लेन क्रमांक १, शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रोड, कात्रज, पुणे) याने ताब्यातील ट्रक हयगयीने व निष्काळजीपणे चालवला.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले, तर बाळासाहेब साळवे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला.




Total Users : 235293