शबनम न्यूज | प्रतिनिधी
पेन्शनचे लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन काढून देण्याच्या बहाण्याने एका ६९ वर्षीय निवृत्त नागरिकाची एक लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती आणि ॲपके डेव्हलपरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमनकुमार कुंजबिहारी लाल (वय ६९, रा. बावधन, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून फिर्यादी यांच्या मोबाईलवरून ही फसवणूक सुरू झाली. फिर्यादी यांच्या फेसबुक अकाउंटवरून ‘PNB HMRS Online Registration’ या नावाच्या पेजवर लाइफ सर्टिफिकेट काढण्याची प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले.
त्यानंतर अज्ञात मोबाईलधारकाने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून ‘PNB Pension Life Certificate Update Online’ या नावाची एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले. या प्रक्रियेच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून एक लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणात अज्ञात मोबाईल क्रमांकधारक आणि ॲपके डेव्हलपर यांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. बावधन पोलीस पुढील तपास करीत आहेत.




Total Users : 235293