शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा, जनसेवेची परंपरा आणि सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी पुढे नेण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
सुनेत्रा अजित पवार यांनी नियुक्तीपत्राद्वारे झिशान सिद्दिकी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या सहकार्याने आणि परिश्रमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे.
मुंबईसारख्या महत्त्वाच्या राजकीय केंद्रात विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने झिशान सिद्दिकी यांच्यासमोर पक्षसंघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्रित आणणे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, अशी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. आगामी काळात ते पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासह संघटनात्मक कामकाजाला कितपत गती देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




Total Users : 234197