मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याबद्दल रवि भिलारे, रितू कांबळे व सिद्धेश सोनकवडे यांच्याकडून आभार
पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथील दोन अल्पवयीन मुलींवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा, तसेच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांचे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याचे स्वागत करण्यात आले आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रवि रामदास भिलारे, सौ. रितू प्रशांत कांबळे आणि सिद्धेश सोनकवडे यांनी मुख्यमंत्री व आमदार शंकर जगताप यांचे आभार व्यक्त केले आहेत.
ताथवडे येथील या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत असताना, पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
दोषींना कठोर शिक्षा व्हावी, ही अपेक्षा
पीडित मुलींना विलंब न होता न्याय मिळावा, दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने हाताळून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शंकर जगताप यांनी या प्रकरणात दाखविलेली संवेदनशीलता व केलेल्या पाठपुराव्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करत, पीडितांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




Total Users : 234051