spot_img
spot_img
spot_img

डोणे मावळमध्ये ‘खेळ पैठणीचा, औदुंबर भाऊजीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!

एकता प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

डोणे, मावळ : एकता प्रतिष्ठान, डोणे मावळ यांच्या वतीने ग्रामदैवत श्री डोणुआईदेवी नवरात्र महोत्सव २०२६ अंतर्गत विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ‘खेळ पैठणीचा, औदुंबर भाऊजीचा’ या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. हरिभक्त परायण विलास महाराज खिलारे, हरिभक्त परायण अनिल महाराज घारे, ग्रामपंचायत सदस्य सागर खिलारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस डोणे मावळचे अध्यक्ष राहुल घारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. मनीषाताई नितीनदादा मुऱ्हे, मावळच्या सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सौ. जयश्रीताई अक्षयदादा येवले, मावळ तालुका सभापती श्री. मनोजदादा येवले, सोमाटणे नगरीचे उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुक्यातील नेते नितीनदादा मुऱ्हे, धामणे गावचे सरपंच पैलवान अविनाश गराडे, बेबडओहळच्या सरपंच सौ. तेजलताई राकेशदादा घारे, नवयुग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण अक्षय महाराज येवले तसेच धामणे ग्रामपंचायतीच्या सदस्य लताताई अविनाश गराडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून महिलांना मनोरंजनाची संधी मिळाली. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामदैवत श्री डोणुआईदेवीच्या नवरात्रोत्सवाला या कार्यक्रमाने विशेष रंगत आणली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!