spot_img
spot_img
spot_img

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित : आमदार शंकर जगताप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट, परस्पर समन्वय आणि नियोजनबद्ध प्रयत्नांच्या बळावर पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चिंचवड मतदार संघाचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीसाठी चिंचवड येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते गुरुवारी (दि. १५) बोलत होते.

या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, सरचिटणीस मधुकर बच्चे, मोरेश्वर शेंडगे,  चिंचवड मतदारसंघातील मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, ॲड. हर्षद नढे, सोमनाथ तापकीर, सनी बारणे, मोहन राऊत,  यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, मतदारसंघातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी आणि मंडलाध्यक्ष उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत निवडणुकीची पूर्वतयारी, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे नियोजन आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.

महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीच्या तयारीला लागावे यासाठी बैठकीत सूचना देण्यात आल्या. मतदारांशी थेट संपर्क साधून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येत आहे. संघटनात्मक ताकद आणि नियोजनाच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांच्या विजय निश्चित आहे.

शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!