spot_img
spot_img
spot_img

नवरात्र निमित्त पिंपळे सौदागर मध्ये रक्तदान शिबीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन , लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर आणि पिंपरी चिंचवड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले. कुंजीर चौकाजवळील उन्नतीच्या प्रांगणात मंगळवार दि. रोजी झालेल्या या शिबिरात जवळपास पन्नासजणांनी रक्तदान केले.

या सर्व रक्तदात्यांची उंची आणि वजन मोजण्यात येऊन त्यानुसार त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शनही करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका विधी समिती सदस्या तथा पिंपळे सौदागर प्रभागाच्या नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या शिबिरास उन्नती सोशल फाउंडेशनचे संचालक संजय भिसे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय सोनार, झोनल चेअर पर्सन लॉ. बालाजी जगताप पिंपरी चिंचवड आर्किटेक्चर संघटनेचे अध्यक्ष ऋषीकेश देवरे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव सखाराम ढाकणे, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी, पदाधिकारी दिलिप चौगुले, रमेश चांडगे, आनंद हास्य क्लबचे बाळकृष्ण चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आधार ब्लड सेंटरच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!