spot_img
spot_img
spot_img

दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी विभागाचा वाळकीत दौरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील वाळकी परिसरातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे व त्यांच्या पथकाने वाळकी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना, पंचनाम्यांची प्रक्रिया आणि शासनस्तरावर सुरू असलेल्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

वाळकी परिसरात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. संभाव्य उपाययोजना कोणत्या असतील, पंचनाम्यांच्या प्रक्रियेत आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरील नियोजनाबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य मार्ग काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले. कृषी विभागाच्या या भेटीमुळे शेतकऱ्यांना संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले. यावेळी पोलीस पाटील निवृत्ती थोरात, सरपंच, माजी उपसरपंच, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!