spot_img
spot_img
spot_img

नानगाव येथे खरीप हंगाम दुष्काळ पंचनामा बाबत जनजागृती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात १०४ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांचा पंचनामा करण्यासाठी अर्ज करावेत, यासाठी नानगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रचार-प्रसिद्धी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात ग्राम महसूल अधिकारी श्रीमती नीलिमा बोकडे, ग्रामपंचायत अधिकारी नानगाव, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती स्नेहल शिंदे तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी खरीप हंगाम दुष्काळ पंचनामा, पीएम किसान योजना आणि महिला शेतकरी प्रमाणपत्र या महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. दुष्काळ पंचनाम्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता, संबंधित प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी तसेच शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती देण्यात आली.

तसेच पीएम किसान योजनेचा लाभ, महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व आणि संबंधित शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी यांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.

शासकीय योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, पात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता यावा आणि दुष्काळ पंचनामा प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन केले. संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!