spot_img
spot_img
spot_img

डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठातर्फे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या वतीने ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विद्यापीठाच्या कुलपती आबेदा इनामदार आणि कुलगुरू डॉ. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला विशेष मान्यता मिळाली आहे.

या सन्मानाबद्दल ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सन्माननीय सागर ढोले पाटील यांनी प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!