spot_img
spot_img
spot_img

ज्ञानेश कुमारची हकालपट्टी करा, एसआयआर रद्द करा

– शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख चेतन पवारांचा एल्गार
– तहसील कार्यालयावर महाआघाडीचा मोर्चा

पिंपरी, ता. 8 : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, एसआयआर (स्पेशल इंटेन्सीव्ह रिव्हिजन) प्रक्रिया रद्द करावी आणि देशात मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांनी केली. निवडणूक प्रक्रियेतील कथित बदलांविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी आज गुरुवारी (ता. 8) शहरात काढलेल्या मोर्चामध्ये केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, एसआयआर प्रक्रिया तसेच केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी सत्ताधा-यांच्या मनमानी कारभारावर टीकास्त्र सोडले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.

चेतन पवार म्हणाले, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आणि निवड यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत काही वर्षांपूर्वी बदल करण्यात आला. या बदलामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा नियुक्ती प्रक्रियेतील सहभाग दूर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीच्या कायदेशीरतेवर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीबाबतही शंका आहे. भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर पध्दतीने ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करुन निवडणूक आयुक्तांचे सर्वाधिकार केंद्रस्थानी आणले आहेत. हे लोकशाही प्रक्रियेला अत्यंत घातक आहे.

एसआयआर प्रक्रिया त्वरित थांबवावी

एसआयआर प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांवरही चेतन पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. एसआयआरच्या प्रक्रियेत बदल करून अधिकारांचे केंद्रीकरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्याचा दावा करत, एसआयआरमुळे मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही प्रक्रिया तत्काळ थांबविण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहिला पाहिजे. लोकशाहीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा चेतन पवार यांनी दिला.

तहसील कार्यालय घोषणांनी दणाणले

मोर्चादरम्यान ज्ञानेश कुमार हटाव, एसआयआर बंद करा, मतपत्रिकेवर निवडणुका घ्या अशा घोषणा देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेच्या मागणीसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी, अशी मागणी चेतन पवार यांनी केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!