spot_img
spot_img
spot_img

मानसिक आरोग्याकडे संवेदनशीलतीने पहावे – पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे

पीसीयू मधे “आत्महत्या बाबतची मानसिकता बदलू या” चर्चासत्र संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ८ ऑक्टोबर २०२६) विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य बाबत संवेदनशील आधार देणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. जीवनातील कठीण प्रसंगात आपले म्हणणे समजून, ऐकून घेणारी तिच्या पाठीशी उभी राहणारी कोणीतरी व्यक्ती हवी असते. मानवी संवेदना आणि योग्य वेळी मिळणारा आधार हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते विद्यार्थ्यांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी मानसिक आरोग्याकडे संवेदनशीलतीने पहावे. एखाद्या व्यक्तीला गरज असल्यास मदतीचा हात पुढे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ, स्कूल ऑफ सायन्सेसच्या राहत डायट अँड वेलनेस क्लिनिक यांच्या वतीने लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या सहसहयोगाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात “आत्महत्या बाबतची मानसिकता बदलू या : संवादाची सुरुवात करू या” या विषयावर चर्चासत्रात कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पीसीयू कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी,कॉलेज ऑफ सायन्सेसच्या अधिष्ठाता प्रा. रुचू कुठियाला, लायन्स क्लबचे रिझन चेअर पर्सन सलीम शिकलगार, मानसोपचार तज्ञ डॉ. संतोष चव्हाण, पीसीयूचे प्रा. सौरभ चव्हाण, मानसोपचार तज्ञ सानिध्या मिसाळ, डॉ. जुई पुजारी, लायन्स क्लबच्या जिल्हा अध्यक्ष रश्मी नायर, पुणे अध्यक्ष संदेश मुखेडकर आदी उपस्थित होते.

डॉ. अनिल माहेश्वरी यांनी सांगितले की, व्यसनाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित, समजूतदार आणि आधार देणारे, संवादात्मक वातावरण निर्माण झाल्यास मदत होऊ शकते.

प्रा. सौरभ चव्हाण यांनी सांगितले की, भावनिक तणावातून जात असलेल्या व्यक्तीतील लक्षणे ओळखणे, योग्य पद्धतीने संवाद साधणे, भावनिक नियंत्रणाचे महत्त्व समजून घेणे आणि संबंधित व्यक्तीला योग्य मदत व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सलीम शिकलगार, डॉ. संतोष चव्हाण यांनी देखील मार्गदर्शन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!