spot_img
spot_img
spot_img

एमपीएससी आंदोलनकर्ते विवेकानंद पाटील यांना पुण्यातील आयटी प्रोफेशनल्सचा जाहीर पाठिंबा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी पुण्यात यशस्वी लढा देणारे धडाडीचे विद्यार्थी नेते विवेकानंद मारुती पाटील यांना पुण्यातील विविध भागांत कार्यरत असणाऱ्या आयटी (IT) क्षेत्रातील तंत्रज्ञांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. आयटी क्षेत्रातील योगेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या संपूर्ण विद्यार्थी चळवळीला आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला.

या प्रसंगी योगेश पाटील यांच्या टीममधील तुषार रसाळ, प्रशांत गोडसे, पंकज खरोसेकर, महेंद्र पाबळे आणि विजय उमरगेकर या पुण्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या आयटी प्रोफेशनल्सनी विवेकानंद पाटील यांची भेट घेतली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा लढा केवळ त्यांचा नसून संपूर्ण तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा अधिकार आहे, अशी भावना व्यक्त करत या आयटी टीमने या आंदोलनाला ग्राउंड लेव्हलवरून पूर्ण सहकार्य व ताकद देण्याचे जाहीर केले.
या सदिच्छा भेटीदरम्यान आयटी टीमच्या वतीने विवेकानंद पाटील यांना ‘अजितपर्व’ हे पुस्तक सप्रेम भेट देऊन त्यांच्या धाडसी नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले. कोल्हापूरच्या माजगाव येथील शेतकरी कुटुंबातून येऊन विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज बनलेले विवेकानंद पाटील आणि पुण्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे आयटी तरुण यांच्या एकत्र येण्याने या आंदोलनाला आता एक नवी सामाजिक व्याप्ती मिळाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!