spot_img
spot_img
spot_img

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रिक्षाचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याची घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला या त्यांचे पती मोहन नथुसिंग राजपूत यांच्यासोबत दुचाकीवरून नेहरूनगरमार्गे थेरगावच्या दिशेने जात होत्या. चाफेकर उड्डाणपुलावर रिक्षाचालक आरोपी वकास अर्जुन बनसोडे याने रिक्षा ओव्हरटेक करत असताना दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे.

या धडकेत फिर्यादींचे पती रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गुंजकर रुग्णालय, चिखली येथे हलविण्यात आले.

दरम्यान, २ ऑक्टोबर २०२६ रोजी उपचार सुरू असताना मोहन राजपूत यांचा मृत्यू झाला. रिक्षाचालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून झालेल्या अपघातास आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी विकास अर्जुन बनसोडे (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची नोंद आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!