spot_img
spot_img
spot_img

वाहनाच्या दंडाच्या बनावट मेसेजद्वारे ९ लाख ९९ हजारांची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वाहनावरील थकीत दंड भरण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून एका खासगी नोकरदाराची तब्बल ९ लाख ९९ हजार ९७१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे घडला. याप्रकरणी विनायक शंकर पाटील (वय ४५, व्यवसाय खासगी नोकरी, रा. युनिटी पॅराडाईज हाऊसिंग सोसायटी, सेक्टर १०, भोसरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने वाहन संदर्भात ‘थकीत दंड भरला नाही तर प्रकरण न्यायालयात पाठविले जाईल’ अशा आशयाचा संदेश पाठविला.

या संदेशामध्ये परिवहन विभागाची अधिकृत वेबसाइट असल्याचे भासविणारी बनावट लिंक देण्यात आली होती. तसेच ‘Mparivahan.apk’ नावाचे अॅप डाउनलोड करण्यासाठी फिर्यादींना प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी तसेच विविध व्यवहारांचे संदेश येऊ लागले.

फिर्यादी यांच्या माहितीनुसार, त्यांच्या ICICI बँक खात्यातून Axis Bank खात्यावर त्यांच्या संमतीशिवाय ९,९९,९७१ रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले. या प्रकारानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!